जिल्ह्यात नाविन्यता परिषद समिती नियुक्त करण्याचे प्रशासनाचे आदेश
By Admin | Updated: April 19, 2015 00:45 IST2015-04-19T00:31:52+5:302015-04-19T00:45:40+5:30
जालना : जिल्ह्यात नाविन्यता परिषद गठण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती तातडीने नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात नाविन्यता परिषद समिती नियुक्त करण्याचे प्रशासनाचे आदेश
जालना : जिल्ह्यात नाविन्यता परिषद गठण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती तातडीने नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवीन संकल्पनेचा आराखडा तयार करून त्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, त्याबाबतच्या प्रचार व प्रसार करण्यास सहाय्य करणे ही प्रामुख्याने उद्दिष्ठ आहेत.
त्याचबरोबर नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाळा, विद्यापिठे तथा संशोधनात्मक संस्था यामधून तज्ज्ञांद्वारे विद्यार्थी, तरूण वर्गाला मार्गदर्शन करणे व पर्यायाने देशाच्या, राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
या परिषदेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी या परिषदेमध्ये तातडीने सदस्यांची नियुक्ती करण्याचे आदेश बैठकीस उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिले.