गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

By Admin | Updated: August 5, 2016 00:10 IST2016-08-04T23:56:24+5:302016-08-05T00:10:34+5:30

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो.

Administration 'watch' on godown | गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’


जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. पूर परिस्थितीसह इतर आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. तालुका निहायही समिती स्थापन असून, जिल्हा कक्ष चोवीस सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. काही धोका होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासनानेही नियोजन केले आहे. जिल्ह्यास साठ किलोमीटरचा गोदाकाठ लाभला आहे. अंबड तालुक्यातील १३ गावे गोदाकाठावर वसलेली आहेत. यात प्रामुख्याने गोंदी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, अपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रूक, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगावचा समावेश आहे.
सध्यस्थितीत पुराचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००६ मध्ये वरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले
होते. यंदा तशी स्थिती नसली तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
अंबड तालुक्यासोबतच भोकरदन तालुक्यातील धामणा, केळणा, रायघोळ नद्या वाहतात. यामुळे शेलूद, पारध व भोकरदन शहरातील झोपडपट्टी भाग पूरप्रवण क्षेत्रात
येतो.
येथील प्रशासनाकडून पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. जाफराबाद तालुक्यातील काळनदीमुळे कोनड, निमखेडा यांना पुराचा फटका बसू शकतो.
परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, गंगाकिनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रूक गोदावरीला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बाणेगाव, सौंदलगाव, लिंगेवाडी, उक्कडगाव, जोगलादेवी, भोगाव, शेवता, कोठी, पांगरी या गावातून १७ गावांतून गोदावरी वाहते याभागाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी)
औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या क्रमांक २३ व्या तुकडीने जालना जिल्हा दत्तक घेतला आहे. या तुकडीतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची पाहणी केली आहे. काही आपत्ती ओढावल्या सैन्य तुकडी तयार आहे. सातही दिवस चोवीस तास आपत्ती कक्ष सुरू राहणार असून, कक्षातील ०२४८२-२२३१३२ तसेच १०७७ टोल फ्री क्रमांक सुरू असल्याचे अधिकारी खान यांनी सांगितले.
नदीपात्रात पाण्याची पातळी समजण्यासाठी धरणापासून ते शेवटपर्यंत खुणा करणे आवश्यक आहे. यात निळी खूण सर्वसाधारण पूर परिस्थिती तर लाल खूण ही धोक्याची सूचना देते. परंतु प्रशासनाकडून अशा खुणा करण्यात आलेल्या नाहीत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थती झाल्यास दहा ते बारा नागरिक बसू शकतील अशा रबर बोट, हुड मास्क, हेल्मेटस, टेबल टॉवर, फोल्डेबल स्ट्रेचर, फायर सुट, फस्टऐड किट, आगरोधक यंत्र, लाईफ जॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Administration 'watch' on godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.