अतिरिक्त गुरूजींचे ‘लातूर’मध्ये समायोजन !

By Admin | Updated: January 7, 2015 01:00 IST2015-01-07T00:58:16+5:302015-01-07T01:00:21+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असल्याने वर्षागणिक अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होत आहे. यंदाही जिल्हाभरात तब्बल ८२ शिक्षक अतिरिक्त आहेत.

Adjustment of Extra Guruji 'Latur'! | अतिरिक्त गुरूजींचे ‘लातूर’मध्ये समायोजन !

अतिरिक्त गुरूजींचे ‘लातूर’मध्ये समायोजन !


उस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असल्याने वर्षागणिक अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होत आहे. यंदाही जिल्हाभरात तब्बल ८२ शिक्षक अतिरिक्त आहेत. आता या शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त असलेल्या ८२ गुरूजींना आता लातूर जिल्ह्याचा रस्ता धरावा लागणार आहे. तसे पत्रही शिक्षण उपसंचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच निमशिक्षांनीही जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत नियुक्ती आदेश देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे प्रशासनही चांगलेच अडचणीत सापडले होते. काही केल्या आंदोलनकर्त्यांचे समाधान होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर यात जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी हस्तक्षेप केला. जसजशा जागा रिक्त होतील, त्यानुसार प्राधान्याने नियुक्त्या देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते. तसचे ज्या निमशिक्षकांना जिल्हा परिषदेने नियुक्ती दिली होती, तेही अतिरिक्त ठरले होते. यांनीही हक्कासाठी आंदोलन केले होते. परंतु, जागा रिक्त नसल्याने प्रशासनाचीही नाविलाज झाला होता. आश्वासन देण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीच नव्हते.े
दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांच्या प्रमाणात जागा रिक्त होत नसल्याने शिक्षण विभागाकडून संबंधित अतिरिक्त गुरूजींची यादी लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली होती. अतिरिक्त शिक्षकांबाबत तोडगा काढण्यासाठी उपसंचालक व्ही. के. खांडके यांच्या प्रमुख उपस्ािितीत २९ डिसेंबर २०१४ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापकांची ३६, माध्यमिक शिक्षक (पदवीधर ४० व प्राथमिक शिक्षक १२७) अशा एकूण २०३ पदे रिक्त असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले हाते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त असलेल्या ८२ गुरूजींना पुढील आठवड्यापर्यंत सामावून घेण्यात यावे, अशा अशयाचे पत्र लातूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच उस्मानाबाद जि.प.लाही याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मात्र, या गुरूजींना आता थेट लातूर जिल्ह्यामध्ये जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)४
अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाने कोंडीत सापडलेल्या शिक्षण विभागाने उपसंचालकांचे पत्र प्राप्त होताच कार्यवाहीला सुरूवात करण्यात केली आहे. शिक्षकांना लातूर येथे पाठविण्यासाठीची संचिका जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निर्णय होवून या शिक्षकांना लातूर जि.प.कडे पाठविण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी जावध यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४
जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या ८२ गुरूजींचा प्रश्न सुटणार असला तरी उर्वरित ४४ निमशिक्षकांचा प्रश्न मात्र कायम आहे. जोपर्यंत नियुक्ती देवून अतिरिक्त ठरलेल्या गुरूजींचे समायोजन होत नाही, तोपर्यंत संबंधित ४४ गुरूजींचा प्रश्न निकाली काढता येत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Adjustment of Extra Guruji 'Latur'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.