प्रशासकीय इमारतीत पाण्याचा ठणठणाट
By Admin | Updated: December 20, 2015 23:51 IST2015-12-20T23:35:58+5:302015-12-20T23:51:19+5:30
लातूर : जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीत नळ बंद असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत

प्रशासकीय इमारतीत पाण्याचा ठणठणाट
लातूर : जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीत नळ बंद असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परिणामी, खासगी जारचे पाणी घ्यावे लागत आहे़ जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय कार्यालय तसेच प्रशासकीय आहे. या इमारतीत विविध विभागांची कार्यालये आहेत. या कार्यालयांसाठी असलेला नळ बंद पडला आहे. एका नळाची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विविध विभागांचे शंभर ते दीडशे कार्यालये प्रशासकीय इमारतीत आहेत. विविध कामांसाठी नागरिकांचा वावर या इमारतीत आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे या इमारतीतील नळ कनेक्शन तोडले आहे. परिणामी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी) भुयारी मार्गाजवळ एका नळाची पाणीगळती सुरु असल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली़ लोकांना पिण्यासाठी पाणी नसताना अशी गळती होणे योग्य नसल्याने ही गळती रोखण्यासाठी एका नळाची जोडणी बंद करण्यात आली़ हा नळ कोणाचा आहे़ याबाबत अद्यापही कुणी पुढे आले नाही़ त्यामुळे नळ कनेक्शन तोडले असल्याचे मनपाच्या शाखा अभियंत्यांनी सांगितले.