जालना पालिकेच्या वीजबिलाचे समायोजन करा

By Admin | Updated: June 17, 2016 00:29 IST2016-06-16T23:52:05+5:302016-06-17T00:29:24+5:30

जालना : महावितरणचे वीजबिलापोटी पालिकेकडे थकित असलेली साडेनऊ कोटींची थकबाकी ही महावितरणकडे खांब आणि डीपीच्या भाडेपोटी थकित रकमेतून

Adjust the electricity bill of Jalna | जालना पालिकेच्या वीजबिलाचे समायोजन करा

जालना पालिकेच्या वीजबिलाचे समायोजन करा


जालना : महावितरणचे वीजबिलापोटी पालिकेकडे थकित असलेली साडेनऊ कोटींची थकबाकी ही महावितरणकडे खांब आणि डीपीच्या भाडेपोटी थकित रकमेतून समायोजित करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य तथा नगरसेविका संध्या देठे यांनी गुरुवारी केली.
जिल्हा नियोजन समितीची गुरुवारी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी नगरसेविका संध्या देठे यांनी हा मुद्दा उपस्थित करुन जालना शहरातील बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. जालना नगर पालिका क्षेत्रात महावितरणचे ३० हजार खांब आणि एक हजार डिपी आहेत. याच्या भाडेपोटी गेल्या २० वर्षांपासून सुमारे १२ कोटी रुपये थकले आहेत. तर महावितरणचे पालिकेकडे पथदिवे आणि इतर वीजबिलापोटी साडेनऊ कोटींची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)
आ. प्रशांत बंब यांनी गंगापूर नगर पालिकेत असाच प्रयोग राबविला आहे. याच धर्तीवर जालना परिषदेकडे थकलेल्या वीजबिलाचे समायोजन करावे, अशी मागणी नगरसेविका संध्या देठे यांनी केली. त्यावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यादृष्टिने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी महावितरण, पालिकेचे अधिकारी यांची बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Adjust the electricity bill of Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.