शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 22, 2023 18:05 IST

शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पूर्वी अधिकमासाच्या महिन्यात मुलीला व जावईबापूला घरी बोलावले जात असे. लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून त्यांचा योग्य तो सन्मान केला जात असे. त्यांना स्वादिष्ट जेवण खाऊ घातले जात असे. ३३ धोंडे, ३३ अनारसे दिले जात. मात्र, आता रेडिमेडचा जमाना आला आहे. या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला थेट रेस्टॉरंटमध्येच बोलावले जात आहे. एवढेच नव्हे तर रेडिमेड आणलेले ३३ अनारसे दिले जात आहेत. आता तर बाजारात रेडिमेड ‘धोंडे’ आले आहेत. तेही आकर्षक पॅकिंगमध्ये दिले जात आहेत. मग, आणखी काय पाहिजे.

याचा अर्थ असा नाही, की सर्वच जण रेस्टॉरंटमध्ये धोंड्याचा कार्यक्रम करतात. घरीसुद्धा मोठ्या थाटात आयोजन करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. लेक व जावयासाठी खुसखुशीत साजूक तुपातील किंवा चांगल्या खाद्यतेलात तळलेले अनारसे, पुरण घालून तयार केलेले धोंडे हौसेने तयार करणाऱ्या सुगरणी सासू आहेत. मात्र, अनेक कुटुंबात नवरा - बायको दोघेही नोकरीवर असल्याने त्यांना घरी अनारसे, धोंडे करण्यास वेळे मिळत नाही. अशा कुटुंबांसाठी किंवा ज्यांना अनारसे, धोंडे व्यवस्थित करता येत नाहीत, अशांसाठी रेडिमेडचा आधार आहेच.

३३ धोंडे ३५० रुपयांतरेडिमेड ३३ धोंडे ३५० रुपयात विकले जात आहेत. त्यासाठी आकर्षक पॅकिंग करून दिली जात आहे. पारंपरिक पद्धतीने धोंडे हे पुरण घातलेले असते. मात्र, पुरणाचे धोंडे दोन दिवसांत खावे लागतात. ते जास्त दिवस टिकत नाहीत. यामुळे रेडिमेडमध्ये खोबरे व पिठी साखर, वेलची घातली जाते. हे धोंडे थोडे जास्त दिवस टिकतात. दुकानदारांनी सांगितले की, अनारसेप्रमाणे धोंडेही तयार करून देता का, अशी मागणी अनेक महिलांनी केली म्हणून आम्ही यंदा रेडिमेड ‘धोंडे’ विक्रीला आणले.

महिलांना मिळाले हंगामी कामशहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. काहींनी तर व्हॉट्सॲपवर याची माहिती टाकणे सुरू केले आहे. आता बचत गटांच्या महिलांनीही सुरुवात केली आहे. शहरातील दुकानदार या महिलांकडून अनारसे खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती आशा रत्नपारखी यांनी दिली.

२ टन अनारसे, १ टन धोंडेआषाढ महिन्यात रेडिमेड अनारसे, धोंडे, बत्तासे, म्हैसूरपाक खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महिनाभरात सुमारे २ टन अनारसे व १ टनच्या जवळपास धोंडे विकले जातील.- विश्वजित भावे, व्यापारी

बाजारातील सर्वसाधारण भाव१) साजूक तुपातील ३३ अनारसे - ४०० रुपये२) साध्या तुपातील ३३ अनारसे- ३०० रुपये३) साजूक तुपातील ३३ धोंडे- ३५० रुपये४) ३३ म्हैसूरपाक -२०० रुपये

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक