शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी बदल्यांचे प्रकरण अपर जिल्हाधिकारी तपासणार

By विकास राऊत | Updated: August 28, 2024 11:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेशी चर्चा केल्यानंतर दिले आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनातील तलाठ्यांच्या बदली प्रकरणावरून नाराजी वाढल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी व सदस्यांशी चर्चा केली. बदल्यांमध्ये नेमका काय घोळ झाला आहे, याची वस्तुस्थिती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्यानंतर अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्याकडून बदल्यांचे पूर्ण प्रकरण तपासण्याबाबत बैठकीत निर्णय झाला.

‘लोकमत’ने २७ ऑगस्टच्या अंकात ‘पैसे कमवायचे असतील तर पैसे द्यावेच लागतील’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनासह तलाठ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याप्रकरणी बैठक लावून सर्व वस्तुस्थिती समजून घेतली.

जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात केलेल्या बदल्यांमुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे अनेकांनी तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर खदखद व्यक्त केली. भविष्यात बदल्यांचा लिलाव आणि घोडेबाजार होण्याचा संशय अनेकांनी सोशल मीडियातील मेसेजमधून व्यक्त केला. ज्यांची बदली मर्जीनुसार झाली, त्यांच्यात तर ‘पैसे कमवायचे असतील तर पैसे द्यावेच लागतील’, अशी चर्चा सुरू असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. दरम्यान, ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर तलाठ्यांसह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण महसूल मंत्र्यांपर्यंत गेले आहे. बदल्यांमध्ये झालेल्या चुकांच्या अनुषंगाने संघटना मुद्देसूद माहितीचा अहवाल तयार करणार आहे.

काय चुका झाल्या ते तपासा...‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर तलाठी संघटनेची बैठक घेतली. बदल्यांच्या प्रकरणात मी काही लक्ष दिले नाही. समुपदेशन समिती माझ्या अध्यक्षतेखाली होती. त्यानुसार सर्व काही नियमानुसार झाले आहे काय, असे विचारल्यानंतर संबंधितांनी होय म्हणून उत्तर दिले. त्यामुळे बदल्यांची याद्यावर स्वाक्षरी केली. बदल्या मनासारख्या होत नसतात. परंतु पारदर्शक प्रक्रिया व्हावी, अशी अपेक्षा आहे. संघटनेचे ऐकून घेतल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांना बदली प्रकरणात काय चुका झाल्या आहेत, ते तपासण्याचे आदेश दिले आहेत.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली