अतिरिक्त सेविकेमुळे अंगणवाडी होणार सक्षम
By Admin | Updated: August 24, 2014 23:54 IST2014-08-24T23:40:14+5:302014-08-24T23:54:26+5:30
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने अतिरिक्त सेविका पदाची भरती केली जाणार आहे.

अतिरिक्त सेविकेमुळे अंगणवाडी होणार सक्षम
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव
ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने अतिरिक्त सेविका पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलेची या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पत्रक सर्व गावांमध्ये पाठविण्यात आले आहे.
हिंगोली तालुक्यात १६८ अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. १६८ ठिकाणी कार्यकर्ती काम करीत आहेत. त्यांना साह्य करण्याच्या दृष्टीने व त्यांच्या सुविधा व आरोग्याची काळजी घेणे, कार्यालयीन कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून एका अंगणवाडीच्या ठिकाणी अतिरिक्त सेविका म्हणून सर्वच ठिकाणी आणखी एक पद भरण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील महिला बालकल्याण व बालविकासाच्या आयुक्तांनी १२ आॅगस्ट रोजी हिंगोली जिल्हा कार्यालयास पत्र पाठवून अतिरिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिंगोली तालुक्यात १६८, वसमत २०३, कळमनुरी ८९, आखाडा बाळापूर १२४, सेनगाव १९९, औंढा १८० अशी एकूण १६३ पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गावांमध्ये पाठविण्यात आलेल्या पत्रकांवर जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण विभाग) यांची स्वाक्षरी आहे.
या पदाच्या निवडीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असलेली त्याच गावची रहिवासी महिला पात्र ठरणार असून तिच वय २९ ते ३० वर्षे असायला हवे. शिवाय दोन अपत्यापेक्षा जास्त मुले नसल्याचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ग्रामीण भागातील अतिरिक्त सेविका (दुसरी कार्यकर्ती) मुळे अंगणवाड्यांचे सक्षमीकरण होणार आहे.