जिल्ह्यात २९ कोरोना रुग्णांची भर, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:03 IST2021-09-13T04:03:47+5:302021-09-13T04:03:47+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १० तर ग्रामीण भागातील १९ ...

Addition of 29 corona patients in the district, 2 deaths | जिल्ह्यात २९ कोरोना रुग्णांची भर, २ मृत्यू

जिल्ह्यात २९ कोरोना रुग्णांची भर, २ मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १० तर ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. उपचार घेऊन २३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून उपचार सुरू असताना जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या रविवारी काहीशी वाढली असून, सध्या २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात वैजापूर तालुका सध्या हाॅटस्पाॅट ठरत आहे. या तालुक्यात रोज सर्वाधिक रुग्णांची वाढ होत असून, रविवारी ११ कोरोना रुग्णांची भर पडली. एकट्या वैजापूर तालुक्यात सध्या ९६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ३५१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ५७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५५३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १५, अशा २३ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, टाकळी सागर, वैजापूर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

कबीरनगर १, मुकुंदवाडी १, देवळाई १, एन पाच, सिडको १, कुशलनगर १, पैठण रोड परिसर १, बीड बायपास रोड १, टीव्ही सेंटर परिसर १, अन्य २

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद १, गंगापूर ४, कन्नड १, वैजापूर ११, पैठण २

Web Title: Addition of 29 corona patients in the district, 2 deaths