जिल्ह्यात १४ कोरोना रुग्णांची भर, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:05 IST2021-09-24T04:05:07+5:302021-09-24T04:05:07+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी मनपा हद्दीत अवघ्या ३ आणि ग्रामीण भागात ११ अशा १४ कोरोना रुग्णांची ...

Addition of 14 corona patients in the district, one death | जिल्ह्यात १४ कोरोना रुग्णांची भर, एक मृत्यू

जिल्ह्यात १४ कोरोना रुग्णांची भर, एक मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी मनपा हद्दीत अवघ्या ३ आणि ग्रामीण भागात ११ अशा १४ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी १४ रुग्णांची भर पडली होती. गुरुवारी देखील एवढ्याच रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ५६७ झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील ११ अशा २१ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरु असताना वाळूज येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

श्रेयनगर १, जालाननगर १, अन्य १

ग्रामीण भागातील रुग्ण

गंगापूर ३, वैजापूर १, पैठण ४, फुलंब्री २, खुलताबाद १

Web Title: Addition of 14 corona patients in the district, one death