शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

औरंगाबादेत कुणी पाळली बंदी; कुणी साधली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:00 AM

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या

ठळक मुद्देप्लास्टिक बंदी : शहरात संमिश्र प्रतिसाद; ओल्या वस्तू कागदी पिशव्यातून नेताना उडाली नागरिकांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या. प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने सुरू होती; पण ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे प्लास्टिक विकण्यावर त्यांचा भर होता. काही दुकानदार ठोक विक्रेत्यांकडून खाकी रंगाच्या कागदी पिशव्या घेऊन जाताना दिसले.जाधववाडीतील फळभाजीपाल्याच्या अडत बाजारात पहाटे अनेक ग्राहकांनी कापडी पिशव्या सोबत आणल्या होत्या. काही ग्राहकांनी वायरच्या पिशव्या खरेदी करून पालेभाज्या नेल्या. शहागंजात हातगाड्यांवरील फळविक्रेते सकाळी कॅरिबॅग देण्यास नकार देत होते. यामुळे अनेक ग्राहक फळे न घेता निघून गेले. काही ग्राहक हातातच केळी, आंबे घेऊन जाताना दिसले. मात्र, दुपारपर्यंतही महानगरपालिकेचे पथक न फिरल्याने काही विक्रेत्यांनी कॅरिबॅगचा वापर सुरू केला. जांभूळ विक्रेत्या महिलांच्या गावी तर बंदी कुठेच नव्हती. फोटोग्राफरला पाहताच त्यांनी कॅरिबॅग पोत्याखाली लपविल्या. आम्ही कॅरिबॅग देत नाही; पण ग्राहकच मागतात, असे राधाबाई जाधव यांनी सांगितले.मोतीकारंजा परिसरातील प्लास्टिकच्या ठोक विक्रेत्यांची दुकाने दिवसभर सुरूहोती. काही दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसली. तेथे पाहणी केली असता किराणा दुकानदार खाकी रंगाच्या कागदी पिशव्या खरेदी करताना दिसले. कॅरिबॅगवर बंदी आहे; पण ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या कॅरिबॅगवर तसेच किराणाच्या कॅरी बॅगवर बंदी आहे की नाही, याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम कायम होता. काही विक्रेते ओळखीच्या ग्राहकांना गुपचूप कॅरिबॅग विकत होते.रोशनगेट ते बुढीलेन या रस्त्यावरील डेअरीवर ग्राहकांना प्लास्टिक बॅगमध्ये दूध दिले जात होते. दुधासाठी प्लास्टिक बॅगवर सरकारने बंदी घातली नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते. शहागंज भाजीमंडईत मोड आलेले कडधान्य कागदी पिशव्यात बांधून देत होते. औरंगपुरा भाजीमंडईत काही ग्राहक सोबत कापडी पिशव्या घेऊन येताना दिसले. येथील भाजी विक्रेते कॅरिबॅग देत नव्हते. प्रत्येक भाजी विक्रेत्यांनी वायरच्या, कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. १० ते २० रुपयांत या पिशव्या खरेदी करून ग्राहक फळ-भाजीपाला घेऊन जात होते. अशीच परिस्थिती हडको, सिडको एन-७, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन भाजीमंडईतही दिसली.वायर, कॉटनच्या पिशव्यांना मागणीगुलमंडी, शहागंज परिसरातील पिशव्या विक्रेत्यांच्या दुकानावर आज तुरळक गर्दी दिसून आली. पिशव्या खरेदी करताना जास्त महिला दिसल्या. काही जणी पालेभाज्यासाठी साड्यांच्या पिशव्या, वायरच्या पिशव्या, काही जणी किराणा सामान आणण्यासाठी कॉटन, ताडपत्रीच्या जाड पिशव्या खरेदी करीत होत्या. वायरच्या पिशव्या १० ते ३५० रुपये, कॉटन १५० ते ५५० रुपये, शॉपिंग बॅग १६० ते ३५० रुपये, ताडपत्रीच्या पिशव्या ५५० ते ६५० रुपयांत विकल्या जात होत्या.खाकी पाकिटाचे भाव वधारलेकॅरिबॅगला पर्याय म्हणून कागदी पाकिटे बाजारात विक्रीला आले आहेत. शहरातील औद्योगिक वसाहत व मुंबई येथून आलेल्या खाकी रंगाच्या कागदी पाकिटाला मागणी वाढली होती. आवक कमी व मागणी जास्त असल्याने आज किलोमागे १० ते २० रुपयांनी भाववाढ करून ते विकल्या जात होते. ५० ते ११० रुपये किलोदरम्यान या खाकी कागदाचे पाकिटे विकल्या जात होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादMarketबाजार