शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अभिनेत्री मयूरी कांगो गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड, औरंगाबादच्या लेकीची गरुडझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 06:56 IST

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी.

औरंगाबाद : औरंगाबादच्या लेकीने जागतिक डिजिटल मीडिया क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. शहरात लहानाची मोठी झालेली व ‘पापा कहते है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री मयूरी कांगोने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला अलविदा केला होता. त्यानंतर डिजिटल मीडिया क्षेत्र पादाक्रांत करीत नुकतेच तिने गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून पदभार स्वीकारला.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी. १२ वीत शिकत असताना सईद मिर्झाच्या ‘नसीम’ या चाकोरीबाहेरच्या चित्रपटाद्वारे तिने चंदेरी दुनियेत पदार्पण केले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘पापा कहते है’ या चित्रपटाने ती प्रसिद्धीझोतात आली. चित्रपटातील ‘घर से निकलते ही..’ या अभिनेता जुगल हंसराजसोबतच्या युगल गीताच्या माध्यमातून तिने तेव्हा अख्ख्या तरुणाईच्या हृदयावर राज्य केले. तेव्हापासून तिची कर्मभूमी मुंबई बनली. त्यानंतर तिने ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जित’, ‘बादल’,‘ जितेंगे हम’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्याच वेळेस टीव्ही चॅनलवरील ‘डॉलर बहू’, ‘थोडासा गम, थोडी खुशी’, ‘दाग’, ‘किटी पार्टी’, ‘घर घर की कहानी’ या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. दरम्यान, अनिवासी भारतीय अमेरिकेतील उद्योजक आदित्य धिल्लन यांच्यासोबत २१ डिसेंबर २००३ रोजी तिचा औरंगाबादमध्ये थाटात विवाह झाला.

लग्नानंतर तिने न्यू यॉर्कमध्येसंसार थाटला. तिथे तिने बरूच कॉलेज झिकलिन स्कूल आॅफ बिझनेस येथे एमबीएची पदवी घेतली. याच काळात ती २०११मध्ये मायदेशी गुडगाव येथे स्थायिक झाली. येथेच तिने प्युबलिसीस या फ्रेंच कंपनीचा भाग असलेल्या परफार्मिक्स या कंपनीसोबत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. याच अनुभवाच्या जोरावर तिला गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेडपदी नियुक्त करण्यात आले आहे.मी खूप आनंदी आहे...‘आज मी खूप आनंदी आहे. गुगल-डॅन आणि फ्युबिलिक्स यांच्या भागीदारीत इंडस्ट्री हेडया पदावर काम करीत आहे. ही खूपमोठी संधी माझ्यासाठी आहे. व्यावसायिकदृष्ट्या भविष्यामध्ये मला यामुळे खूप फायदा होईल,’ असे मयूरीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :googleगुगलAurangabadऔरंगाबाद