अश्लील चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई

By Admin | Updated: February 27, 2016 00:15 IST2016-02-27T00:09:02+5:302016-02-27T00:15:35+5:30

हट्टा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास अश्लील चाळे करुन शांततेचा भंग करणाऱ्या चौदा महिला व दोन पुरुषांवर हट्टा पोलिसांनी कारवाई केली.

Action on women who are sexually suggestive | अश्लील चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई

अश्लील चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई

हट्टा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास अश्लील चाळे करुन शांततेचा भंग करणाऱ्या चौदा महिला व दोन पुरुषांवर हट्टा पोलिसांनी कारवाई केली.
जवळा बाजार परिसरात काही महिला अश्लील चाळे करीत असल्याची हट्टा पोलिसांना खबर मिळताच पोनि सुनील रसाळ यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे चौदा महिला व दोन पुरुष अश्लील चाळे करताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना औंढा नागनाथ येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पथकात फौजदार महंमद जमील, पोना इम्राण सिद्दीकी, शिंदे, पाईकराव, भोंग यांचा समावेश होता. (वार्ताहर)

Web Title: Action on women who are sexually suggestive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.