दोन कृषी विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:09:18+5:302014-07-16T01:26:50+5:30
जालना : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जि.प.च्या कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून दोन दिवसांमध्ये दोन विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दोन कृषी विक्रेत्यांवर कारवाई
जालना : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जि.प.च्या कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून दोन दिवसांमध्ये दोन विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कापूस उत्पादक म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. यावषी बीटी कपाशीचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची फारशी ओरड नव्हती. तथापि पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्या परिस्थितीत होत्या. मागील आठवडाभरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरेदीची लगबग सुरू झाली. युरियाची बाजारात उपलब्धता होऊनही हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांना काही विक्री केंद्र जादा भावाने युरीया खत विकत असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकास सापळे रचून कारवाया करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार मोहीम अधिकारी पी.एस. पवार, जिल्हा कृषी अधिकारी ए.ए. सोनवणे, कोकाटे यांच्या भरारी पथकाने हसनाबाद ता. भोकरदन येथील न्यू मराठवाडा कृषी सेवा केंद्रावर छापा मारला, तेव्हा केंद्रचालक जादा दराने कृषी निविष्ठा देताना आढळून आला. तर मंगळवारी वाटुरफाटा येथील प्रगत कृषी सेवा केंद्रावर असाच प्रकार आढळून आला. संबंधित कृषी केंद्र चालकांविरूद्ध परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना आवाहन
जिल्ह्यात कुठल्याही कृषी निविष्ठा विक्रेता बियाणे वा खताची जादा दराने विक्री करीत असेल तर कृषी विभागास कळवावे, असे आवाहन कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे, कृषी अधिकारी गंजेवार यांनी केले.