शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

छत्रपती संभाजीनगरात कारवाईचा बडगा; रिक्षाचालक बीड बायपास, वाळूज, ग्रामीणकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:09 IST

दोन दिवसांत ६७९ रिक्षांची तपासणी, रविवारी रात्रीतून १३ रिक्षा जप्त, ५६ हजार रुपयांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य मार्ग, चौकांमध्ये पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच काही रिक्षाचालकांनी शहराबाहेरील मार्गांवर आपला व्यवसाय वळविल्याचे दिसून येत आहे. बीड बायपास, केंब्रिज परिसरासह वाळूज परिसरात अधिक रिक्षा चालवणे सुरू केले. त्यात रविवारी रात्रीतून वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक १०३ रिक्षांची तपासणी करत ६ रिक्षा जप्त केल्या.

रिक्षा व्यवसायातील गुन्हेगारांचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणून शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. रोज सिडको चौक, बाबा चौक, रेल्वे स्थानक परिसरात स्थानिक पोलिस ठाण्यांचे कर्मचारी, मुख्यालयाच्या अंमलदारांसह कारवाई करीत आहेत. यात रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान देखील विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. यात एकूण ६७९ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. यात ३५१ चालक नियमबाह्य रिक्षा चालवताना सापडल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.

एकूण तपासलेल्या रिक्षा : ६७९कारवाई : ३५१जमा रिक्षा : १३एकूण दंडाची रक्कम : २ लाख ६८ हजार ६०० रुपये.वसूल रक्कम : ५५ हजार ९००

बाबा चौकाने घेतला माेकळा श्वासबेशिस्त रिक्षाचालकांनी बाबा चौकात वाटेल तेथे रिक्षा उभे करणे सुरू केले होते. प्रामुख्याने मिलकॉर्नरकडे घेणाऱ्या वळणासह रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात येणाऱ्या चौकात दोन्ही बाजूने रिक्षा उभ्या राहतात. सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी चौकात बेशिस्तपणे रिक्षा उभे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने सोमवारी दोन्ही बाजू रिकाम्या झाल्याने अन्य वाहनचालक सहज वळण घेऊ शकले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीauto rickshawऑटो रिक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस