अधीक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई
By Admin | Updated: April 6, 2017 23:24 IST2017-04-06T23:21:19+5:302017-04-06T23:24:09+5:30
लातूर : वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकास निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्याच्या आयुक्तांकडे सादर केला आहे़

अधीक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई
लातूर : सामाजिक न्याय विभागाच्या रेणापूर तालुक्यातील बावची येथील निवासी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचा ताप येऊन मृत्यू झाल्याची घटना एक महिन्यापुर्वी घडली़ दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी बुधवारी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असल्याने वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकास निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्याच्या आयुक्तांकडे सादर केला आहे़
बावची येथील निवासी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या बालिका चिकटे या मुलीचा ताप येऊन महिनाभरापूर्वी मृत्यू झाला़