वडोदबाजार पोलिसांकडून वाळूच्या वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:54 IST2018-01-11T23:54:35+5:302018-01-11T23:54:41+5:30
बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करुन वाहतूक करणारे दोन ट्रक वडोदबाजार पोलिसांनी गुरुवारी सकाळी पीरबावडा येथे पकडले. हायवा ट्रक क्र. एम एच २०-सीटी-६९६९ मधून चार ब्रॉस वाळू नेली जात होती. हा हायवा राजूर रोडवरील पीरबावडा येथील एका पंपाजवळ पकडण्यात आला.

वडोदबाजार पोलिसांकडून वाळूच्या वाहनांवर कारवाई
वडोदबाजार : बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करुन वाहतूक करणारे दोन ट्रक वडोदबाजार पोलिसांनी गुरुवारी सकाळी पीरबावडा येथे पकडले.
हायवा ट्रक क्र. एम एच २०-सीटी-६९६९ मधून चार ब्रॉस वाळू नेली जात होती. हा हायवा राजूर रोडवरील पीरबावडा येथील एका पंपाजवळ पकडण्यात आला. तर पीरबावडा बसस्थानक परिसरात टिप्पर क्र. एम एच २१-एक्स -२३७४ मधील दोन ब्रॉस वाळूची विक्री होत असताना पोलिसांनी छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच चालकाने धूम ठोकली. सदरची वाळू जालना जिल्ह्यातील हसनाबाद परिसरातील गिरीजा नदीच्या पात्रातून आणली जात होती. या प्रकरणी हायवाचा चालक आरोपी कृष्णा जगन्नाथ पवार रा. खंडाळा ता. भोकरदन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. अर्चना पाटील करीत आहेत.