वाळूमाफियांवर कारवाई; महिलेने दिली विनयभंगाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:44 IST2017-04-16T23:41:00+5:302017-04-16T23:44:23+5:30
अंबड : तालुक्यातील महसूल प्रशासन व वाळू माफियांमधील संघर्ष एका वेगळया वळणावर आला आहे.

वाळूमाफियांवर कारवाई; महिलेने दिली विनयभंगाची तक्रार
अंबड : तालुक्यातील महसूल प्रशासन व वाळू माफियांमधील संघर्ष एका वेगळया वळणावर आला आहे. शनिवारी औरंगाबाद येथील महिलेने महसूल पथकातील तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला विनयभंग केल्याची तर महसूल पथकाने सदर महिलेने अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करताना सरकारी कामात अडथळा केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रात्री उशिरा दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकूणच अधिकारी व वाळू माफियांतील संघर्ष तीव्र झाला आहे.
तलाठी प्रफुल्ल बाबासाहेब मिसाळ यांनी शनिवारी रात्री उशिरा अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमृता अकोलकर व तिचा भाऊ यांनी बीड-औरंगाबाद रोडवरील जामखेड फाटा येथे अंबड तहसिल कार्यालयाचे अवैध वाळू वाहतूक प्रतिबंधक पथक अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना अमृता अकोलकर व त्यांचा भाऊ यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील पंचनामा हिसकावून शिवीगाळ करत खोटया केसेस दाखल करण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण
केला.
याप्रकरणी प्रफुल्ल मिसाळ यांच्या तक्रारीवरुन अमृता अकोलकर व त्यांच्या भावाविरुध्द कलम ३५३, ५०४, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. राजपुत करत आहेत. (वार्ताहर)