१ कोटी ८ लाखांचा कृती आराखडा मंजूर
By Admin | Updated: December 3, 2014 01:15 IST2014-12-03T01:00:05+5:302014-12-03T01:15:13+5:30
मंठा : तालुक्यातील दुष्काळ निवारणार्थ संभाव्य पाणी टंचाई रोजगार आदी बाबत आढावा बैठकीनंतर तहसील कार्यालयाकडून पाठविलेल्या १ कोटी ८ लाखांच्या कृती आराखड्यास

१ कोटी ८ लाखांचा कृती आराखडा मंजूर
मंठा : तालुक्यातील दुष्काळ निवारणार्थ संभाव्य पाणी टंचाई रोजगार आदी बाबत आढावा बैठकीनंतर तहसील कार्यालयाकडून पाठविलेल्या १ कोटी ८ लाखांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली.
मंठा तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवत आहे. तर अनेक मजूर ऊसतोडीनिमित्त स्थलांतरित झाले असताना या गंभीर बाबीची प्रशानाने दखल घेऊन चारा, पाणी, मजुरांना कामासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांच्या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, सदरील निधी हा केवळ आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१४ या तीन महिन्यांसाठी असून, पुढील कृती आराखडा निधी नव्याने मिळणार असल्याचे तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.
या निधीमधून विहीर अधिग्रहण, टँकर, नळयोजना दुरुस्ती, विहीर दुरूस्ती, विहीर गाळ काढणे, एमआरईजीएस अंतर्गत मागेल त्याला तात्काळ काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मंठा तालुक्यातील अनेक गावात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना होते की नाही, याबाबत वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात येणार असून, हयगय करणाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे यांनी दिला.
तर पालक सचिव आनंद गंजेवार यांनी विभागनिहाय आढावा घेतल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांची प्रशासन विशेष दखल घेत असल्याचे प्रथमदर्शी जाणवत आहे. (वार्ताहर)४
तालुक्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही गावांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. दुष्काळ निवारणासाठी एक कोटी आठ लाख रुपयांचा निधी वरील तीन महिन्यांसाठी आहे. पुढील काळासाठी आणखी नवीन निधी मिळणार तसेच मागेल त्याला काम देणार असल्याचे तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.