कृती आराखड्यास मंजुरी
By Admin | Updated: August 17, 2016 00:51 IST2016-08-17T00:13:03+5:302016-08-17T00:51:53+5:30
वाळूज महानगर : वाळूज परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत वादळी चर्चा होऊन विविध विकास कामांसंदर्भात ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आले

कृती आराखड्यास मंजुरी
वाळूज महानगर : वाळूज परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत वादळी चर्चा होऊन विविध विकास कामांसंदर्भात ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आले. बहुतांश ठिकाणी ग्रामसभेत नागरिकांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करून त्यांना धारेवर धरले. या ग्रामसभेत गोंधळातच विविध ठराव संमत करण्यात आले.
जोगेश्वरी
जोगेश्वरी येथे आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण दुबिले तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, उपसरपंच मंगलबाई नीळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर नीळ, माजी सरपंच योगेश दळवी, नजीरखाँ पठाण आदींची उपस्थिती होती.
या ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आमचं गाव-आमचा विकास कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रतीक्षा यादीत नसलेल्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०१७-१८ चा कृती आराखडा तयार करण्यात आला.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. गावातील जि.प. शाळेत इयत्ता दहावीपर्यंत वर्ग सुरू करणे, विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या शाळा जोगेश्वरीत स्थलांतरित करणे, आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण, ईदगाह व कब्रस्तानच्या असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारून सुशोभीकरण इ. विषयी चर्चा करण्यात आली.
या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ काजळे, पंडित पनाड, कलीम शहा, सूर्यभान काजळे, ज्ञानेश्वर कर्डीले, ज्ञानेश्वर कर्डीले, सुनील वाघमारे, विलास नरवडे, सुरेश सरोदे, हरिदास चव्हाण, रमेश सोनकांबळे, सोनू लोहकरे, छाया बोंबले, कल्याण साबळे, काशीनाथ भावले, भास्कर दुबिले आदींची उपस्थिती होती.
वडगाव
वडगाव येथे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश भोंडवे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, उपसरपंच हौसाबाई पाटोळे आदींची उपस्थिती होती. आमचं गाव-आमचा विकास या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बजाजनगरातील थकीत कराचा मुद्दा चांगलाच गाजला. कडक कारवाई करून कर वसुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. ग्रामसभेला श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, सचिन गरड, मंदा भोकरे, वैशाली जिवरग,श्रीकृष्ण भोळे, कृष्णा साळे, सुनील काळे, प्रकाश निकम, परमेश्वर मदन, जितू दहातोंडे, प्रा. विलास पठारे आदींची उपस्थिती होती.