आकडेबहाद्दरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:06 IST2017-11-29T00:06:23+5:302017-11-29T00:06:37+5:30
शेतातील विद्युत खांबारील वीजचोरी करणाºयांविरूद्ध महावितरणने २८ नोव्हेंबर रोजी कारवाई केली.

आकडेबहाद्दरांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतातील विद्युत खांबारील वीजचोरी करणाºयांविरूद्ध महावितरणने २८ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. पेडगाव नांदुरा या ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे, शिवाय काही जणांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने सांगितले.
ग्रामीण भागातील रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत चालल्याने महावितरणने ही मोहीम हाती घेतली आहे. शेतातील विद्युत खांबावरून वीजचोरी होत असल्याने रोहित्र जळत असल्याने मंगळवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. जाधव, शांतीलाल चौधरी, दिनकर पिसे, तारे आदींनी कारवाई केली. यावेळी काही जणांकडून वीजचोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शेतातील होणारी वीजचोरीबाबत आता महावितरणकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.