आठ दिवसांत कारवाई
By Admin | Updated: March 17, 2015 00:48 IST2015-03-17T00:28:40+5:302015-03-17T00:48:38+5:30
औरंगाबाद : नियमानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जानेवारीमध्येच शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून

आठ दिवसांत कारवाई
औरंगाबाद : नियमानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जानेवारीमध्येच शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी करणाऱ्या शाळांची माहिती शिक्षण विभाग संकलित करीत आहे. येत्या आठ दिवसांत दोषी शाळांविरुद्ध कारवाई करू, अशी माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली.
शिक्षण समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक बैठकीत शाळा प्रवेशावर चर्चा झाल्याचे सांगून तांबे म्हणाले, ज्या शाळांविरुद्ध तक्रारी येतील, त्या शाळांविरुद्ध कारवाई करण्याचे सांगण्यात आलेले
आहे.
सोबतच शहरात होर्डिंग व प्रवेशाच्या जाहिराती देणाऱ्या शाळांची माहिती संकलित केली जात आहे. संपूर्ण माहिती जमा झाल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला
जाईल.
आपसी बदल्यांची प्रकरणे निकाली का काढली जात नाहीत, शिक्षणसेवकांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना स्थायित्वाचे आदेश का देण्यात येत नाहीत, आदी प्रश्न श्याम राजपूत यांनी उपस्थित केले. शिक्षकांना स्थायी करण्यासाठी शिक्षण विभाग वारंवार सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवितात; परंतु तेथून संचिका परत येते, असे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. ३ लाख ९० हजार रुपयांत नवीन वर्ग खोल्या बांधण्यास कुणीही तयार होत नाही. त्यामुळे एवढ्या रकमेत बसणाऱ्या खोल्यांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना सुरेखा जाधव यांनी केली.
बैठकीला सदस्या संगीता सुंब, सुरेखा जाधव, पुष्पा जाधव, बबन कुंडारे, प्रभाकर काळे, मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी आदींची उपस्थिती
होती.