बोगस डॉक्टरवर कारवाई

By Admin | Updated: August 7, 2014 01:56 IST2014-08-07T01:19:19+5:302014-08-07T01:56:22+5:30

कडेठाण : येथे अनेक दिवसांपासून खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरवर पैठण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली.

Action on the bogus doctor | बोगस डॉक्टरवर कारवाई

बोगस डॉक्टरवर कारवाई

कडेठाण : येथे अनेक दिवसांपासून खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरवर पैठण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली. बुधवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या कारवाईने तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राला जबर हादरा बसला आहे. डॉ. उज्ज्वल विश्वास असे कारवाई करण्यात आलेल्या खाजगी डॉक्टरचे नाव असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पैठण येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.जे. पारसेवार यांच्यासह आडूळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे व कर्मचाऱ्यांच्या पथकाने कडेठाण येथील डॉ. उज्ज्वल

विश्वास यांच्या दवाखान्याची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया अ‍ॅक्टनुसार नोंदणी असलेले प्रमाणपत्र किंवा नोंदणी क्रमांकाची कागदपत्रे आढळून आली नाहीत. तेव्हा पथकाने अधिक चौकशी करून पंचनामा केला. या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून ते यासंदर्भात योग्य ती कारवाई करतील, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
नोटिसीला उत्तरच नाही ग्रामस्थांचे निवेदन
विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेले डॉ. उज्ज्वल विश्वास यांना याआधी नोटीस देऊन विचारणा करण्यात आली होती; परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, त्यामुळे अचानक धाड टाकावी लागल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पारसेवार यांनी सांगितले.
कडेठाण येथे डॉक्टर उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी सरपंच अभिजित तवार, माजी पं.स. उपसभापती भारत तवार, राजेंद्र महाराज, भूषण तवार, कृष्णा जाधव यांनी डॉ. पारसेवार यांना निवेदन दिले.

Web Title: Action on the bogus doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.