वैजापुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:06 IST2021-03-21T04:06:21+5:302021-03-21T04:06:21+5:30

वैजापूर शहर व तालुक्यात कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे तहसीलदार राहुल गायकवाड, मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत, पोलीस निरीक्षक ...

Action against unmasked people in Vaijapur | वैजापुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

वैजापुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

वैजापूर शहर व तालुक्यात कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे तहसीलदार राहुल गायकवाड, मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली. तर कारवाई बरोबरच जनजागृती करीत मास्कचे ही वाटप केले. वैजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाजी मंडई या ठिकाणी कारवाई करण्यात आली. वैजापूर ग्रामीण एक ग्रामपंचायतीने एका दारू विक्रेत्याला अकरा हजार रुपयांचा दंड ठोठावला. निश्चल रामैय्या असे दारू विक्री करीत असलेल्या दुकानदाराचे नाव आहे. या दुकानात गर्दी होत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात येतात निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच कविता गायकवाड, ग्रामसेविका रेखा जोशी व ग्रामपंचायत सदस्य यांनी दारू विक्रेत्यावर अकरा हजार रुपये दंड ठोठावला. एका राजस्थानी स्वीट मार्ट दुकानदाराने कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्याला ११०० रुपयांचा दंड ठोठावला.

--

फोटो :

१) दारू विक्रेत्यावर कारवाई करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक.

२) विनामास्क फिरणाऱ्यांवर वैजापूर पोलिसांनी कारवाई केली. तर मास्कचे वाटप करून जनजागृतीही करण्यात आली.

Web Title: Action against unmasked people in Vaijapur