वीजचोरी प्रकरणी ६५ जणाविरूध्द कारवाई
By Admin | Updated: May 14, 2017 23:16 IST2017-05-14T23:14:00+5:302017-05-14T23:16:13+5:30
आवारपिंपरी : परंडा तालुक्यातील शिराळा, शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या गावात महावितरणच्या पथकाने १२ मे रोजी वीजचोरांविरूध्द कारवाई केली

वीजचोरी प्रकरणी ६५ जणाविरूध्द कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपिंपरी : परंडा तालुक्यातील शिराळा, शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या गावात महावितरणच्या पथकाने १२ मे रोजी वीजचोरांविरूध्द कारवाई केली होती़ या कारवाईत तब्बल ६५ जण वीजचोरी करीत असल्याचे समोर आले असून, संबंधितांविरूध्द कलम १२६/ १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे़
महावितरणच्या पथकाने शिराळा व शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या आवारपिंपरी, वागेगव्हाण, शेळगाव, सक्करवाडी, लोणारवाडी, लोखंडवाडी, पांढरेवाडी, चिंचपूर गावातील वीजचोरांविरूध्द १२ मे रोजी कारवाई मोहीम राबविली होती़ परंडा येथील उपकार्यकारी अभियंता आर.एच. आडम, शिराळाचे कनिष्ठ अभियंता डी.अ. दमुसे, शेळगावचे कनिष्ठ अभियंता पी.आर. गायकवाड यांच्यासह ८ जणांच्या पथकाने ही कारवाई केली़ कारवाईची कुणकुण लागताच वीज चोरांनी आकडे काढून घेतले. या कारवाईत ६५ जण दोषी आढळून आले असून, त्यांच्याविरूध्द कलम १२६/ १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे़