१७५ वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: December 16, 2015 23:31 IST2015-12-16T23:21:52+5:302015-12-16T23:31:23+5:30
ंगंगाखेड : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरुद्ध १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.

१७५ वाहनांवर कारवाई
ंगंगाखेड : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरुद्ध १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १७५ वाहनाधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गंगाखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी गंगाखेड पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी साडेचार ते साडेसातच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
शहरातील परळी नाका, डॉ. आंबेडकर चौक, दिलकश चौक, भगवती चौक, बसस्थानक आदी परिसरात पोलिस अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके स्थापण्यात आली होती. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये १७५ वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, गंगाखेड शहरातील मुख्य चौकात पोलिसांच्या पथकाकडून सुरू असलेल्या कारवाईची चर्चा शहरात पसरली होती. यामुळे अनेक वाहनधारकांनी पर्यायी रस्ते शोधून दंड वाचविण्याचा प्रयत्न केला.
या मोहिमेत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप कांबळे, पंडीत रेजीतवाड, फौजदार भास्कर नवले, रवी मुंडे, राहूल बद्दूर यांचे पथक निर्माण करण्यात आले होते. तसेच या कारवाईत वाहतूक शाखेचे नवनाथ मुंडे, राजेश चक्कर पाटील, रामराव जाधव, माणिक वाघ, किर्तेश्वर तेलंगे, वसंत निळे, गणेश वाघ, सोमवंशी, राजेश्वर पाटील, करवर यांचाही सहभाग होता. ३० पोलिस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. मोहिमेतून २० हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वाहनधारकांकडूून वसूल केला. (प्रतिनिधी)