जवळ्यात पकडले १० आंबटशौकिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:29 IST2017-09-26T00:29:08+5:302017-09-26T00:29:08+5:30

येथील औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावरील सतरा मैल कॅनल जवळील वेश्या वस्तीत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० जणांना ताब्यात घेतले आहे.

Across 10 Acrobats | जवळ्यात पकडले १० आंबटशौकिन

जवळ्यात पकडले १० आंबटशौकिन

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : येथील औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावरील सतरा मैल कॅनल जवळील वेश्या वस्तीत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० जणांना ताब्यात घेतले आहे.
कारवाई सहा.पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २४ सप्टेंबरच्या रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास पोहेकॉ शेख खुद्दूस, पोना काळे, वाघ, चाबूकस्वार, सय्यद, विभुते यांच्या पथकाने केली. जवळा बाजार सतरा मैल कॅनलजवळील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड व बायांना अश्लील चाळे, हातवारे करीत असताना रंगेहाथ पकडले.
यामध्ये आरोपी राहुल विश्वनाथ राऊत (२०), संदीप प्रकाश राऊत (२४), लक्ष्मण विठ्ठल दशरथे (२२), अरूण भीकाजी राऊत, मुंजाजी ज्ञानोबा दशरथे, बळीराम बाळासाहेब दशरथे सर्व रा. परळी दशरथे, देवराव चांदू खंदारे (२४), जयराम बबन लोंढे (२०) रा. आडगाव रंजे., ज्ञानेश्वर मारोती गाडेकर (३०, वडगाव), फुलाजी भाऊराव अंभोरे (३०) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध कलम ११०/११७ महाराष्टÑ पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. यापूर्वीही येथे दोनदा कारवाई झाली आहे.

Web Title: Across 10 Acrobats