१८ गावांतील टंचाई निवारणार्थ ३३ जलस्त्रोतांचे अधिग्रहण
By Admin | Updated: March 19, 2016 20:18 IST2016-03-19T20:13:32+5:302016-03-19T20:18:23+5:30
सेनगाव : मार्च महिन्यात पाणीटंचाईची दाहकता तालुक्यात वाढली आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

१८ गावांतील टंचाई निवारणार्थ ३३ जलस्त्रोतांचे अधिग्रहण
सेनगाव : मार्च महिन्यात पाणीटंचाईची दाहकता तालुक्यात वाढली आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. अशा स्थितीत प्रशासन स्तरावरून संथगतीने उपाययोजना होत असून सद्य:स्थितीत तालुक्यातील १८ गावांत ३३ खाजगी जयस्त्रोत अधिग्रहण करण्यात आले आहेत.
पाणीपातळी खालावल्याने सेनगाव शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व भागात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावातील नळयोजना, हातपंप पाण्याअभावी बंद पडल्याने खाजगी जलस्त्रोतांवर गावाची तहान भागविली जात आहे. येथील पंचायत समितीने पाणीटंचाई निवारण करण्यासाठी १५ मार्चपर्यंत १८ गावातील ३३ खाजगी जलस्त्रोत अधिग्रहण केले. तर मंजुरी आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये गारखेडा, जामआंध, शिवणी बु., पार्डी पोहकर, तळणी, केलसुला, केंद्रा खु., सुकळी बु., सावरखेडा, जामठी बु., घोरदरी, शेगाव खो., देवूळगाव आदी गावात प्रत्येकी एक अधिग्रहण केले आहे. तर जयपूर येथे चार, गोरेगाव- आठ, हत्ता ना- पाच, खिल्लार-दोन असे एकूण ३३ जलस्त्रोत अधिग्रहण केले आहेत. १६ गावांतील २१ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची स्थळ पाहणी पंचनामा करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे पाठविले असून पंचनामे होणे बाकी आहेत.
बटवाडी ग्रामपंचायतचा टँकर मागणीचा प्रस्ताव आहे; परंतु अद्यापपर्यंत त्यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याने येथे भीषण पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून अनेक गावात येणाऱ्या कालावधीत अन्य उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)