१,२३७ विहिरींचे अधिग्रहण

By Admin | Updated: July 2, 2014 01:03 IST2014-07-02T00:56:46+5:302014-07-02T01:03:23+5:30

औरंगाबाद : विभागात पाणीपुरवठ्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे.

Acquisition of 1,237 wells | १,२३७ विहिरींचे अधिग्रहण

१,२३७ विहिरींचे अधिग्रहण

औरंगाबाद : विभागात पाणीपुरवठ्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १,२३७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक ४२८ विहिरी एकट्या बीड जिल्ह्यात अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात ३१०, जालना जिल्ह्यात ५४, हिंगोली जिल्ह्यात १२, नांदेड जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात १३९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २४६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या १०७ ने वाढली आहे.
मोठ्या प्रकल्पातील साठ्यांची स्थिती
जायकवाडी- ४ टक्के
येलदरी- ४० टक्के
सिद्धेश्वर- ० टक्का
माजलगाव- ० टक्का
मांजरा- ० टक्का
ऊर्ध्व पेनगंगा- ४४ टक्के
निम्न तेरणा- ० टक्का
मनार- १९ टक्के
विष्णुपुरी- १० टक्के
निम्न दुधना- ३२ टक्के
सिना कोळेगाव- ० टक्का
एकूण सरासरी- १८ टक्के

Web Title: Acquisition of 1,237 wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.