अॅसिड प्राशन केलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 23:53 IST2016-07-06T23:40:53+5:302016-07-06T23:53:31+5:30
लातूर : किल्लारी येथील सराफा दाम्पत्यातील संजीवनी पोतदार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अॅसिड प्राशन केलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक
लातूर : किल्लारी येथील सराफा दाम्पत्यातील संजीवनी पोतदार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
किल्लारी येथील अजित पोतदार व त्यांच्या पत्नी संजीवनी पोतदार यांनी सोमवारी मध्यरात्री अॅसिड प्राशन केले होते़ त्यांना उपचारासाठी तत्काळ लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारआधीच अजित पोतदार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ तर संजीवनी पोतदार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले होते़ पण नातेवार्ईकांनी मंगळवारी संजीवनी पोतदार यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे़ संजीवनी पोतदार यांनी अॅसिड प्राशन केले असल्याने त्यांच्या आतड्यांना अनेक जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.