किती विघ्न आले तरी आपले लक्ष्य गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:47+5:302021-02-05T04:18:47+5:30

औरंगाबाद : जीवन जगणे सहज नाही. जीवनात कोरोनासारखी लहान-मोठी अनेक विघ्ने येतील; पण न डगमगता विघ्न पार करीत आपल्या ...

Achieve your goals no matter how many obstacles | किती विघ्न आले तरी आपले लक्ष्य गाठा

किती विघ्न आले तरी आपले लक्ष्य गाठा

औरंगाबाद : जीवन जगणे सहज नाही. जीवनात कोरोनासारखी लहान-मोठी अनेक विघ्ने येतील; पण न डगमगता विघ्न पार करीत आपल्या या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट्य गाठा, असे मार्गदर्शन आगम रत्नाकर श्रमण संघीय युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांनी येथे केले.

महावीर भवनात तब्बल एका वर्षानंतर शनिवारी जाहीर प्रवचनाला सुरुवात झाली. महेंद्रऋषीजी म.सा. आदिठाणा ५ यांचे येथे शुक्रवारी सायंकाळी आगमन झाले. धर्मपीठावर महासतीयाजी सुमनप्रभाजी म.सा., किरणसुधाजी म.सा आदिठाणा यांची उपस्थिती होती.

महेंद्रऋषीजी म.सा यांनी सांगितले की, आपण म्हणतो १०० वर्षे जगला, ६० वर्षे जगला; पण हे जीवन खूप छोटे आहे. त्यात अनेक विघ्ने येत असतात. शारीरिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक विघ्नांचा त्यात समावेश असतो. कोरोनाने सर्वांना कसे जगावे याची शिकवण दिली आहे.

जीवनाचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वप्रथम आपल्या अंतःकरणाची शुद्धी करा, ध्यानधारणा करा, कर्ममुक्तीचा पुरुषार्थ करा, असा मौलिक सल्ला महाराजांनी दिला.

पुण्य जेव्हा बलवान होते, तेव्हाच गुरूचे दर्शन होते, असे महासतीयाजी किरणसुधाजी म.सा यांनी सांगितले. गुरू सर्वांना जीवन जगण्याची कला शिकवितात, असे महासतीयाजी सुमनप्रभाजी म.सा. यांनी नमूद केले. इंदरचंद संचेती यांनी सूत्रसंचालन केले. प्रवचन सोहळा यशस्वितेसाठी श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगारिया, मिठालाल कांकरिया, सुभाष देसरडा, दिलीप मुगदिया, बालचंद पोखरणा, राजेंद्र मुनोत, पारसमल बाफना, कमलाबाई ओत्सवाल, सविता लोढा, मंगल चुत्तर, सरिता बंब परिश्रम घेत आहेत.

चौकट

लहान मुलांकडून शिका पारदर्शकता

पार्थ व तनिष्क संकलेचा हे दोन लहान भावंडं जळगावपासून ते औरंगाबादपर्यंत आमच्यासोबत १५ दिवस होते. पारदर्शक कसे राहावे ते भाविकांनी या मुलांकडून शिकले पाहिजे, असे सांगत महेंद्रऋषीजी म. सा. यांनी त्या लहान भावंडांचा व त्यांच्या पालकांचा गौरव केला.

कॅप्शन

महावीर भवनात वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित धर्मसभेत मार्गदर्शन करताना आगम रत्नाकर श्रमण संघीय युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. आदिठाणा.

Web Title: Achieve your goals no matter how many obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.