आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे आज आगमन
By Admin | Updated: June 2, 2014 01:35 IST2014-06-02T01:31:25+5:302014-06-02T01:35:08+5:30
औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे.

आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे आज आगमन
औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांनी आजपर्यंत २८५ पुस्तके लिहिली आहेत. नागपूर, रायपूर येथील चातुर्मास संपवून हजारो कि.मी.चा प्रवास पायी प्रवास करीत महाराजांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. सकाळी ६ वाजता केम्ब्रिज शाळेजवळील जकात नाका येथे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ६.३० वाजता धूत हॉस्पिटलपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांसोबत आचार्य पद्मसुंदरसुरीश्वर म.सा., पन्यास युगसुंदर विजयजी म.सा. आदी १२ ठाणा व १८ साध्वीगण येणार आहेत. महाराजांचे प्रथमच औरंगाबादेत आगमन होत असल्याने भव्य शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता चिकलठाणा परिसरातील प्रकाशचंद बाफना यांच्या निवास्थानी शोभायात्रेची सांगता होणार आहे. यानंतर ८.४५ ते १० वाजेदरम्यान आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज व गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन संघ सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. परिवर्तन प्रवचनमालेचे आयोजन शहरातील विविध भागांत २ ते २९ जून आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ व ४ जूनदरम्यान रोजी बिग बाझार हॉल, जालना रोड. ५ व ६ रोजी बालाजी मंगल कार्यालय, बालाजीनगर. ७ ते ९ जून चंद्रसागर धर्मशाळा, शहागंज. १० ते १२ जूनदरम्यान जोहरीवाडा, रंगारगल्ली. १३ ते १५ जूनदरम्यान महावीर भवन, कुंभारवाडा. १६ ते १८ जूनदरम्यान अग्रसेन भवन, पानदरिबा येथे प्रवचन होणार आहे. १९ ते २० जूनदरम्यान तिवारी मंगल कार्यालय, वेदांतनगर. २१ ते २४ जूनदरम्यान वर्धमान रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क. २५ जून रोजी अग्रसेन भवन, सिडको येथे प्रवचन होणार आहे. २९ जून रोजी रोजी चातुर्मास प्रवेश सिडको एन-३ येथील केसरबाग मंगल कार्यालयात होणार आहे.