आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजारात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:14 IST2016-07-11T01:06:16+5:302016-07-11T01:14:38+5:30
औरंगाबाद : ‘आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव आये है, नयी रोशनी लाये है’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात रविवारी चातुर्मासानिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजार येथील जैन मंदिरात आगमन झाले.

आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजारात आगमन
औरंगाबाद : ‘आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव आये है, नयी रोशनी लाये है’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात रविवारी चातुर्मासानिमित्त आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघाचे राजाबाजार येथील जैन मंदिरात आगमन झाले.
सकाळी अरिहंतनगर जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात झाली. बालाजीनगर जैन मंदिर, मोंढा नाकामार्गे महाराजांचे राजाबाजारात आगमन झाले. महाराजांसमवेत मुनीश्री सुयशगुप्तीजी, मुनीश्री चंद्रगुप्तजी, आर्यिका सुनिधीमती माताजी, आर्यिका सुनिती माताजी यांचेही आगमन झाले. जैन पंचायतच्या वतीने महाराजांचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेदरम्यान रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिला डोक्यावर मंगलकलश घेऊन अग्रभागी चालत होत्या. सर्वप्रथम पंचायतच्या वतीने आचार्यश्रींचे पादप्रक्षालन करण्यात आले. आचार्यश्रींनी भगवान शांतीनाथांचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला. यावेळी मुनीश्री सुयशगुप्तीजी यांनी सांगितले की, आचार्यश्रींचे चातुर्मासानिमित्त आगमन झाले आहे.
चातुर्मास कालावधीत भाविकांनी ‘थ्रीजी व फोरजी’ वरील लक्ष कमी करून गुरुदेवांकडे जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून तुम्हाला समाजाविषयी ज्ञान प्राप्त होईल. औरंगाबादेतील जैन समाजाच्या सामाजिक एकतेची प्रशंसा करून गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी चातुर्मासात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पंचायत व चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, न्या. कैलासचंद चांदीवाल, डी. बी. कासलीवाल, माणिकचंद गंगवाल, एम. आर. बडजाते, चांदमल चांदीवाल, भागचंद बिनायके, किरण पहाडे, विनोद लोहाडे, अशोक गंगवाल यांच्यासह समाजबांधव हजर होते.
चातुर्मास कलश स्थापना
चातुर्मासामध्ये १९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव. २२ रोजी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचा २६ वा दीक्षा दिवस व चातुर्मास कलश स्थापनेचा कार्यक्रम सराफा येथील अग्रसेन भवन येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.