दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेल्या आरोपीने तरुणाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:02 IST2021-06-27T04:02:52+5:302021-06-27T04:02:52+5:30

प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार शेख वसीम शेख सलीम (वय १९, रा. गरमपाणी) हा २४ जून रोजी सायंकाळी साडेसहा ...

The accused, who was released from jail a month and a half ago, robbed the youth | दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेल्या आरोपीने तरुणाला लुटले

दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेल्या आरोपीने तरुणाला लुटले

प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार शेख वसीम शेख सलीम (वय १९, रा. गरमपाणी) हा २४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बिलाल यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी चाँद पाशा तेथे आला आणि त्याने वसीमकडे पैशाची मागणी केली. वसीमने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला राग आला. यावेळी त्याने वसीमला शिवीगाळ करीत त्याच्या डोळ्यावर जोरात ठोसा मारला. यानंतर खिशातील चाकू काढून त्याने त्यास धमकावले आणि वसीमच्या खिशातील साडेसहाशे रुपये बळजबरीने काढून घेतले. यानंतर तो तेथून पळून गेला. या घटनेनंतर वसीमने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. चांद पाशा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चोरीच्या गुन्ह्यात बेगमपुरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. ४ मे रोजी न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. जामिनावर जेलमधून बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The accused, who was released from jail a month and a half ago, robbed the youth