बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 23:08 IST2017-01-07T23:07:10+5:302017-01-07T23:08:40+5:30

लातूर : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शाळकरी मुलाचे अपहरण करणारे चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

The accused in the rape case is absconding! | बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच !

बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच !

लातूर : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शाळकरी मुलाचे अपहरण करणारे चार आरोपी अद्यापही फरार आहेत. यातील प्रमुख आरोपी महेश सोनटक्के याच्याविरुद्घ शुक्रवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून अद्यापही तो फरार आहे.
चाकूर तालुक्यातील चापोली येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीशी जवळीकता साधून लग्न करण्याचे आमिष दाखवून महेश सोनटक्के (रा. लातूर रोड, ता. चाकूर) याने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची कबुली चाकूर पोलिसांना पीडित मुलीने दिल्यानंतर चाकूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. महेश आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांविरुद्घ मुलीच्या भावाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यापूर्वीच चाकूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. चापोलीतील ‘त्या’ मुलीने आजोळी विष प्राशन केल्याने शुक्रवारी घटनेला कलाटणी मिळाली. मुलीच्या जबाबावरुन महेश सोनटक्केविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेला तैनात आहेत.

Web Title: The accused in the rape case is absconding!