शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना चकवा; बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भर रस्त्यावरून हातकडीसह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:19 IST

लघुशंकेचे नाटक करत भर रस्त्यावरून हातकडीसह पोबारा

छत्रपती संभाजीनगर : बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या प्रियकराने लघुशंकेचे नाटक करत भर रस्त्यावरून हातकडीसह पोबारा केला. मंगळवारी सायंकाळी अयोध्या मैदानासमोर भर रस्त्यावर ही घटना घडली. तुषार किसन करपे (२३, रा. विरमगाव, फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे.

२२ वर्षीय तरुणीने त्याच्याविरोधात वेदांतनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. फेब्रुवारी, २०२४ मध्ये धुळ्यात असताना तिची मेसचे डबे पुरवणाऱ्या तुषारसोबत ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी पदमपुऱ्यात स्थायिक झाली. त्या दरम्यान मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तुषारने तिला लग्नाचे आमिष दाखवत मे, २०२४ मध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले. ४ नोव्हेंबर रोजी तरुणीला धमकावून लग्नासाठी पळून नेले. तेव्हा कुटुंबाच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

गुन्ह्यानंतर अटकतक्रार झाल्याने तुषार दोन दिवसांत तरुणीसह ठाण्यात हजर झाला. तेव्हा त्याच्या दबावामुळे मी पोलिसांना खोटा जबाब दिल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्यानंतरही त्याने अत्याचार केले. सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करून बदनामी केली. मुलीने याबाबत वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्याकडे तक्रार केली. बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच तुषारला सोमवारी अटक झाली. ॲट्रॉसिटीच्या कलमामुळे सहायक आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास गेला.

लघुशंकेचे नाटक, हाताला झटका देऊन पसारतुषारला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सायंकाळी अंमलदार त्याला वेदांतनगर ठाण्यात घेऊन आले. ५.३० वाजता त्याची घाटीत तपासणी करायची होती. अंमलदार प्रवीण मुळे त्यासाठी आवश्यक कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी शिंदे यांच्या कार्यालयात गेले. त्या दरम्यान अंमलदार पी. जी. नागरे, चालक जारवाल दोन होमगार्डसह तुषारला घेऊन घाटीकडे निघाले. ठाण्यातून निघाल्यानंतर काहीच मिनिटांत तुषारने लघुशंकेचे नाटक केले. जारवाल यांनी अयोध्या मैदानासमोर गाडी थांबवली. तेथे तुषारने नागरेंच्या हाताला झटका देत हातकडीसह मैदानावरून सुसाट पोबारा केला. अन्य तिघांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो हाती लागला नाही. रात्री उशिरापर्यंत वेदांतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची दोन पथके त्याचा शोध घेत होती.छायाचित्र

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर