खून प्रकरणातील आरोपीस अटक
By Admin | Updated: June 24, 2017 23:40 IST2017-06-24T23:38:58+5:302017-06-24T23:40:35+5:30
परभणी : पाच महिन्यांपूर्वी परभणी येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस २४ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खून प्रकरणातील आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाच महिन्यांपूर्वी परभणी येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस २४ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी शहरातील धाररोड भागात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. हडको परिसरातील राजू जाधव याचा पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वी चार आरोपींना अटक केली असून पाचवा आरोपी परभणी शहरात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोपी दीपक देशमुख (काळे) यास अटक केली. पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक सोडगीर, अनिल कटारे, संजय पुरी, सय्यद उमर यांनी ही कारवाई केली.