छत्रपती संभाजीनगर : बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याऐवजी नियुक्त कंपनीचे आठजणांनी मिळून १ कोटी १६ लाख ८० हजार रुपये परस्पर लंपास केले होते. मार्च २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील आरोपी तब्बल तीन वर्षांनी पोलिसांना शहरातच सापडले. गुरुवारी रात्री त्यांना सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
शहरातील एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक ऑफ इंडिया या तीन राष्ट्रीयीकृत बँका तर एचडीएफसी, आयसीआयसीआयसह खासगी नऊ बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकण्याचे काम त्यांच्या सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या कंपनीकडे होते. काम मनोज सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यामार्फत करून घेण्यात येत होते. एमएसपीमध्ये कार्यरत योगेश पुंजाराम काजळकर (३५), अनिल अशोक कांबळे (३५), सिद्धान्त रमाकांत हिवराळे (२७, सर्व रा. भीमनगर, भावसिंगपुरा), सचिन एकनाथ रंधे (३२, रा. राजनगर, जटवाडा) हे ते काम करत हाेते. संजय भालचंद्र जाधव (४४, रा. गट नं. ५ बजाजनगर) याच्याकडे ऑडिटची जबाबदारी होती. बँकेने ठरवून दिल्याप्रमाणे रक्कम काढून बँकेच्या एटीएममध्ये टाकण्याची जबाबदारी ही सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत वरील सहाजण त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे पार पाडणे बंधनकारक होते. मात्र, अशा २९ एटीएममध्ये तब्बल १ कोटी १६ लाख ८० हजार २०० रुपयांची रक्कम न भरता रिपोर्टमध्ये खोट्या नोंदी करून रक्कम आराेपींनी हडप केली. ऑडिटर जाधव याने ते पैसे भरल्याचे खोटे अहवाल तयार केले. एटीएमच्या ऑडिटमध्ये मात्र हे पितळ उघडे पडले. तेव्हा १० मार्च २०२२ रोजी या प्रकरणी सदर सहाजणांसोबत बाबासाहेब शामराव अंभुरे, अविनाश ज्ञानेश्वर पडूळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन वर्षांनंतर कळला आरोपींचा ठावठिकाणागेल्या दोन दिवसांत गुन्हे शाखेला या गुन्ह्यातील सहा आरोपी शहरातच फिरत असल्याचे कळले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने भावसिंगपुरा, जटवाडा, गोपाल टी परिसर आणि मोहटादेवी मंदिर परिसरातील कापड दुकानातून आरोपींना अटक केली.
यांना झाली अटकअमित गंगावणे, अनिल कांबळे, योगेश काजळकर, सिद्धान्त हिवराळे, सचिन रंधे, संजय जाधव यांना अटक करण्यात आली.
Web Summary : Accused of embezzling ₹1.16 crore from ATM deposits in 2022, six suspects were arrested in Chhatrapati Sambhajinagar after three years. They manipulated ATM reports and siphoned funds, leading to their capture.
Web Summary : एटीएम में जमा करने के लिए दिए गए 1.16 करोड़ रुपये के गबन के आरोप में, छह संदिग्धों को तीन साल बाद छत्रपति संभाजीनगर में गिरफ्तार किया गया। उन्होंने एटीएम रिपोर्ट में हेरफेर किया और धन निकाल लिया, जिसके कारण वे पकड़े गए।