शहरात फौजदारास आरोपीची धक्काबुक्की
By Admin | Updated: May 8, 2014 23:35 IST2014-05-08T23:35:07+5:302014-05-08T23:35:52+5:30
जालना: फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेले सपोनि किरण बिडवे यांना आरोपीने धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी घडली.

शहरात फौजदारास आरोपीची धक्काबुक्की
जालना: मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेले सपोनि किरण बिडवे यांना आरोपीने धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री १२. ३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील चामडा बाजार भागातील रहिवासी नबी खान बाबू खान याच्याविरूद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात शेख वाहब यांच्या तक्रारीवरून १३ एप्रिल रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून नबीखान फरार होता. मंगळवारी तो घरी असल्याची माहिती मिळाल्याने स.पो.नि. बिडवे व त्यांचे सहकारी त्यास अटक करण्यासाठी गेले. तेव्हा नबी खान याने बिडवे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यास सपोनि बिडवे यांनी अटक करून ठाण्यात आणले. तेथे त्याच्याविरूद्ध फिर्याद नोंदविली. सदर बाजार पोलिस ठाण्यात नबीखान विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यास जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यात जरी जामीन मिळाला असला तरी त्यास पूर्वीच्या मारहाण प्रकरणी बुधवारी अटक दाखविण्यात आली. (वार्ताहर) अवैध लाकडाची वाहतूक; १५ हजारांचा माल जप्त जालना येथील राजूर चौफुली येथे अवैध लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच.१४/७०६८) वन विभागाच्या अधिकार्यांनी गुरूवारी पकडला. दुपारी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी १५ हजार रुपये किंमतीचे आंब्याचे लाकूड व टेम्पो जप्त केला. टेम्पोचालक अफजलखान लियाकत खान पठाण यास अटक करण्यात आली.