देशी दारूचे गोडाऊन फोडणारे आरोपी, मुद्देमालासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:05 IST2021-02-06T04:05:36+5:302021-02-06T04:05:36+5:30

वडोद बाजार : चिंचखेडा येथील देशी दारूचे गोडाऊन फोडून दारूची चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद ...

Accused of breaking into a liquor store, arrested with issue | देशी दारूचे गोडाऊन फोडणारे आरोपी, मुद्देमालासह जेरबंद

देशी दारूचे गोडाऊन फोडणारे आरोपी, मुद्देमालासह जेरबंद

वडोद बाजार : चिंचखेडा येथील देशी दारूचे गोडाऊन फोडून दारूची चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले.

फिर्यादी मनोज जयस्वाल यांच्या मालकीचे चिंचखेडा येथे देशी दारूचे गोडाऊन आहे. २४ जानेवारी रोजी चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून देशी दारूचे १५५ बॉक्स (२.९२ लाख ) ट्रकमध्ये टाकून चोरून नेले. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासात घनसावंगी (जि. जालना) तालुक्यातील श्रीपत धामणगाव गावातील कबीर पठाण आणि त्याचा भाऊ जब्बार पठाण यांनी त्यांच्या साथीदारांसह ही चोरी केली असल्याचे समोर आले. जबार बुढण पठाण (वय २८) याच्याकडून चोरी गेलेल्या मालापैकी २.१६ लाखांचा माल मिळून आला. ८२ सीलबंद बॉक्स मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पो. उ. नि. संदीप सोळुंके, गणेश राऊत, पो. हे. राजेंद्र जोशी, संजय काळे, पो. ना. शेख नदीम संजय भोसले, पो. कॉ. बाबासाहेब नवले, गणेश खांडगे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांचा समावेश होता.

--------

Web Title: Accused of breaking into a liquor store, arrested with issue