महिलेसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:05 IST2021-02-25T04:05:11+5:302021-02-25T04:05:11+5:30

अनिल कल्याण तुपे (३६, रा. रांजणगाव), असे आरोपीचे नाव आहे. महिलेचाही वाळूज औद्योगिक वसाहतीत व्यवसाय आहे. ती मंगळवारी सायंकाळी ...

Accused arrested for committing obscenity in front of a woman | महिलेसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

महिलेसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

अनिल कल्याण तुपे (३६, रा. रांजणगाव), असे आरोपीचे नाव आहे.

महिलेचाही वाळूज औद्योगिक वसाहतीत व्यवसाय आहे. ती मंगळवारी सायंकाळी घराच्या परिसरात फिरत असताना आरोपी तुपे हा तिच्या जवळून दुचाकीवरून पुढे गेला. यानंतर पुढे काही अंतरावर रस्त्यावर दुचाकी उभी करून तो दुचाकीवरून उतरून उभा राहिला. त्याने त्याची पँटची चेन उघडून तिच्यासमोर अश्लील कृत्य करू लागला. यामुळे संतापलेल्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली आणि ती आरडाओरड करीत घरी जाऊ लागली. यावेळी आरोपीने तिच्यासोबत झटापट करीत चावी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश न आल्याने तो दुचाकी ढकलत घेऊन जाऊ लागला. यावेळी तिचे नातेवाईक आणि अन्य लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे तपास करीत आहेत.(फोटोसह )

Web Title: Accused arrested for committing obscenity in front of a woman