अटक वॉरंटमधील आरोपींना पळविले

By Admin | Updated: August 13, 2014 00:47 IST2014-08-13T00:42:04+5:302014-08-13T00:47:33+5:30

किनवट : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जमादाराला मारहाण करण्यात आली, याशिवाय दोघांना पळवून लावण्यात आल्याची घटना तालुक्यातील मांडवा येथे घडली.

The accused arrested in the arrest warrant | अटक वॉरंटमधील आरोपींना पळविले

अटक वॉरंटमधील आरोपींना पळविले

किनवट : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जमादाराला मारहाण करण्यात आली, याशिवाय दोघांना पळवून लावण्यात आल्याची घटना तालुक्यातील मांडवा येथे ११ आॅगस्ट रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडली.
जेएमएफसी न्यायालय कंधार यांनी एमएलए ८५/१२ उषाताई रमेश रावसाहेब शिंदे (रा. मांडवा) यांच्या नावे असलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी ११ आॅगस्ट रोजी रात्री मांडवा येथे विलास शिंदे यांच्या घरी जमादार उत्तम वरपडे गेले होते. यावेळी आरोपी विलास रावसाहेब शिंदे, रावसाहेब व्यंकोबा शिंदे यांनी संगनमत करुन वरपडे व सोबतच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. वॉरंटमधील आरोपीस पळवून लावले. याप्रकरणी वरपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किनवट पोलिसांनी आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला. पोना तेलंगे तपास करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: The accused arrested in the arrest warrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.