स्थागुशाला हवे आहेत आरोपी
By Admin | Updated: June 12, 2016 22:55 IST2016-06-12T22:53:39+5:302016-06-12T22:55:04+5:30
परभणी : केबीसी प्रकरणात लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण आणि इतर आरोपींचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेलाही करावयाचा असून, आरोपी भाऊसाहेब चव्हाणसह इतर आरोपींना ताब्यात द्यावे,

स्थागुशाला हवे आहेत आरोपी
परभणी : केबीसी प्रकरणात लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण आणि इतर आरोपींचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेलाही करावयाचा असून, आरोपी भाऊसाहेब चव्हाणसह इतर आरोपींना ताब्यात द्यावे, अशी विनंती स्थागुशाच्या वतीने न्यायालयाकडे केली जाणार आहे.
केबीसी प्रकरणात परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ११ गुन्हे दाखल आहेत़ त्यापैकी ७ गुन्ह्यांचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेतील अधिकारी करीत आहेत़ या गुन्ह्याच्या अनुषंगाने केबीसी प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण याच्यासह नानासाहेब चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, आरती चव्हाण या आरोपींचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे़ दरम्यान, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडील आरोपींची पोलिस कोठडी १३ जून रोजी संपत असून, स्थागिक गुन्हा अन्वेषण शाखेत तपासावर असलेल्या केबीसीच्या चार प्रकरणात्ां आरोपींना ताब्यात द्यावे, अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.