अत्याचार प्रकरणी आरोपीस कोठडी

By Admin | Updated: November 22, 2015 23:41 IST2015-11-22T23:38:36+5:302015-11-22T23:41:24+5:30

शिराढोण : कळंब तालुक्यातील जायफळ येथील आरोग्य उपकेंद्राजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म देणाऱ्या २२

Accused accused in the case | अत्याचार प्रकरणी आरोपीस कोठडी

अत्याचार प्रकरणी आरोपीस कोठडी


शिराढोण : कळंब तालुक्यातील जायफळ येथील आरोग्य उपकेंद्राजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म देणाऱ्या २२ वर्षीय युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ तिची न्यायालयाने सुधारगृहात रवानगी केली. जबरी अत्याचार प्रकरणात जायफळ येथीलच एका युवकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे़
जायफळ येथील आरोग्य उपकेंद्राजवळ ९ नोव्हेंबर रोजी एका स्त्री जातीचे मयत अर्भक आढळून आले होते़ घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि एम़ एच़ सय्यद, पोना संजय नायकल यांनी तपासाची चक्रे फिरवून जायफळ येथील एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिने गावातीलच राजू नवनाथ नरसिंगे (वय-२२) याने पैशाचे आमिष दाखवून सहा ते सात वेळा जबरी अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले़ शिवाय मयत अर्भकही तिचेच असल्याची कबुली दिली़ पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची सुधारगृहात रवानगी केली़ त्या युवतीच्या माहितीवरून पोलिसांनी राजू नरसिंगे याच्याविरूध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

Web Title: Accused accused in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.