जि.प.च्या अर्थसंकल्पास मान्यता
By Admin | Updated: March 27, 2015 00:43 IST2015-03-27T00:36:34+5:302015-03-27T00:43:37+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेने सन २०१५-१६ च्या ३४ कोटी १ लाख ४४ हजार ६६० रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली.

जि.प.च्या अर्थसंकल्पास मान्यता
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेने सन २०१५-१६ च्या ३४ कोटी १ लाख ४४ हजार ६६० रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. एक लाख ३ हजार ५६० रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महसुली खर्चासाठी २० कोटी ७७ लाख ५७ हजार ६०० रुपये आणि भांडवली खर्चासाठी ७ कोटी ३८ लाख ३ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली.
जि. प. चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अर्थ सभापती संतोष जाधव यांनी सन २०१४-१५चा सुधारित आणि सन २०१५-१६ चा मूळ अर्थसंकल्प पंचायत समित्यांच्या संकलित अर्थसंकल्पासह सादर केला. यावेळी सभापती म्हणाले, जिल्हा परिषदेचे उत्पन्न मर्यादित असले तरी, उत्पन्नवाढीसाठी जि.प.ने हस्तांतर व अभिकरण योजनेतील शिल्लक निधीचे नियोजन करून केलेल्या गुंतवणुकीमुळे मिळालेल्या व्याजातून जि.प.च्या उत्पन्नात ७ कोटी १२ लाखांनी वाढ झाली आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सभापती विनोद तांबे, महिला बालकल्याण सभापती सरला मनगटे, शिवसेनेचे गटनेते मनाजी मिसाळ, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोटे, संतोष माने, अॅड. मनोहर गवई, नंदा काळे आदींनी मते मांडली. मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी सदस्यांचे शंकासमाधान केले.