शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुपर पॉवर कंपनीचे व्यवहार सांभाळणाऱ्या लेखापालास अटक

By admin | Updated: August 17, 2014 01:44 IST

औरंगाबाद : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीच्या लेखापालास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून पकडून आणले.

औरंगाबाद : अल्पावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवहाराचा लेखाजोखा ठेवणाऱ्या लेखापालास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून पकडून आणले. आरोपीला न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या नंदा बळीराम पाटील यांच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक दीपक कडू पारखे आणि दिव्या दीपक पारखे या दाम्पत्याविरोधात २५ जुलै रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते सध्या अटकेत आहेत. आरोपींनी आतापर्यंत सुमारे ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या व्यवहाराचा लेखाजोखा ठेवणारा आणि आरोपीचा प्रमुख साथीदार शेख मोहम्मद शाहिद हमीद हमीद इब्रे मोहम्मद ऊर्फ गुड्डू (२४, रा.कठडा, टाकळी रोड, नाशिक) हा असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्याआधारे भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांनी त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले. याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना कळविली. पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील, पोहेकॉ संदेश कीर्तिकर, प्रदीप धनवे, सचिन संपाळ, दादासाहेब झारगड यांनी नाशिक येथे जाऊन त्यास अटक करून आणले. त्याच्याकडून कंपनीच्या कामकाजासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप, एक संगणक आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.