शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:54 IST

ही घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे.

फकिरा देशमुख

भोकरदन: बहिणीच्या घरी आमरसाचा पाहुणचार खाण्यासाठी निघालेल्या भावासह त्याचा लहान मुलाचा अपघातीमृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे. तसेच, या अपघातात जखमी झालेली भावजय मृत्यूशी झुंझ देत आहे.

सविस्तर माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूरच्या रामेश्वर वाडी येथील शंकर भागचंद महेर(वय 30) ममता शंकर महेर(वय 25) व मुलगा रोहन शंकर महेर वय(10) यांच्यासह दुचाकीवर निघाले  होते. आज म्हणजेच 12 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान ते भोकरदनकडून पासोडी(ता.जाफराबाद) येथे बहिणीच्या घरी आमरसाचे जेवण करण्यासाठी निघाले. यादरम्यान वाटेत माहोरा ते जाफराबाद रोडवरील वीटभट्टीजवळ विटाने भरलेल्या टॅक्टरला त्यांची पाठीमागून धडक लागली. 

या अपघातात शंकर महेर व रोहन महेर या बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी ममता महेर या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बहिणीने फोडला हंबरडा

जेवणासाठी वाट बघत असलेल्या बहिणीला भाऊ व भाचा अपघातात ठार झाल्याची बातमी कळताच त्यांनी हंबरडा फोडला. त्या भावाच्या व भाच्याच्या अंत्यविधीसाठी भोकरदन तालुक्यातील रामेश्वर वाडी येथे दाखल झाल्या असून या बाप लेकावर रात्री शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यूbhokardan-acभोकरदनJalanaजालना