शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:48 IST

वेग आवरा, वाहन हळू चालवा

- राम शिनगारेऔरंगाबाद : शहर, जिल्ह्यामध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लावलेले होते. या काळात रस्त्यावर वाहने येत नव्हती. त्यामुळे अपघातांची संख्या घटली होती. २०२१ मध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर वाहने रस्त्यावर आली. त्यातही प्रत्येकाला स्वत:च्या वाहनातूनच प्रवास करायचा असल्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी आहे. शहरातील बीड बायपासवर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

११ महिन्यांत ५०४ जणांचा मृत्यूशहर आणि जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते ३१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ५०४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. यातील १३९ मृत्यू हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झाले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये अपघातात ३६५ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. शहरात नोव्हेंबरपर्यंत ४२७ अपघात झाले. त्यात ३५८ जण गंभीर जखमी झाले. १३९ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये नोव्हेंबरपर्यंत ५४० अपघात झाले आहेत. त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या ३३६ आहे. त्यात एकूण ३६५ जणांना प्राणास मुकावे लागले. जखमींची संख्या २५४ आहे.

सर्वाधिक मृत्यू बीड बायपासवरशहर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे बीड बायपासवर झाले आहेत. त्यातच आता बीड बायपासचे काम सुरू असून, नवीन बायपास वाहतुकीला खुला झाला आहे. त्यावरही अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे बायपासवर वाहन हळू चालविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावाशहरातील अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले पाहिजे. याशिवाय चारचाकी गाडीमध्येही सीट बेल्ट लावलेला असेल तरच अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा कार्यरत होते. त्यामुळे सीट बेल्ट लावलाच पाहिजे, असे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले.

वेग आवरारस्त्यावर वाहन चालविताना काही वेगाची मर्यादा घालून दिलेली आहे. ही मर्यादा ओलांडू नये. वेगावर आवर घातल्यास प्राणांतिक अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद