गतिरोधकामुळे कामगाराचे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:14 IST2019-12-01T21:14:42+5:302019-12-01T21:14:58+5:30
रांजणगाव येथील गतीरोधकावर आदळून दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

गतिरोधकामुळे कामगाराचे अपघात
औरंगाबाद : मोरे चौक ते रांजणगाव रस्त्यावर गतीरोधक टाकून वाहनाची गती रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु रांजणगाव येथील गतीरोधकावर आदळून दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
रांजणगाव परिरातील खाजगी दवाखान्यात चार कर्मचाऱ्यांना दाखल करण्यात आले. तुकाराम नागरगोजे यांची दुचाकी अचानक आदळली त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून खाली पडल्याने ते जखमी झाले.
रस्त्यावर घाईघाईने टाकलेले गतीरोधकची उंची अधिकची झाली असल्याने गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्या गतीरोधकाची उंची कमी करावी किंवा प्लॉस्टीकचे गतीरोधक टाकण्याची मागणी नरेंद्र यादव यांच्यासह नागरिकांतून केली जात आहे.