वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात

By Admin | Updated: December 16, 2015 00:19 IST2015-12-16T00:06:12+5:302015-12-16T00:19:22+5:30

फुलंब्री : तालुक्यातील खामगाव येथील अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर विद्युत खांबावर जाऊन आदळले व पलटी झाले.

Accident of the sand traversing tractor | वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात

वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात

फुलंब्री : तालुक्यातील खामगाव येथील अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर विद्युत खांबावर जाऊन आदळले व पलटी झाले. या अपघातात जीवितहानी थोडक्यात टळली असून, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वडोदबाजार पोलिसांकडून होतो आहे.
फुलंब्री तालुक्यात वाळूचा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे, त्याचे उदाहरण रविवारी (दि.१३) खामगाव येथे पाहायला मिळाले. वाळू भरलेले विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव जात असताना गोरक्ष विद्यालयासमोरील विद्युत खांबावर आदळून पलटी झाले. यात चालक थोडक्यात बचावला. या प्रकरणाची माहिती वडोदबाजार पोलिसांना देण्यात आली.
वडोदबाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दोन कर्मचाऱ्यांसह सरकारी वाहनाने घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी या अपघाताची कोणतीही दखल घेतली नाही. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या वाळूसंदर्भात विचारणा केली नाही. संबंधित अधिकाऱ्याने याविषयी स्वत: फिर्याद देऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता; पण तसे न करता ट्रॅक्टर सोडून दिले. या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे.
खामगाव येथे घडलेल्या प्रकाराच्या दिवशी मी सुट्टीवर होतो. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन.पी. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Accident of the sand traversing tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.